विकेंडचा सिसिफस
सरासरी सत्तर वर्षांचा माणसाच्या जगण्याचा तुकडा असतो. अर्थात, हरारी म्हणतो तशी ही सरासरी नजीकच्या ते दूरच्या भविष्यात वाढून दिडशे किंवा त्याहून अधिक वैगेरे झाली तरी ती उच्चउत्पन्न गटासाठी असेल. क्वांटाईल रेशो किंवा गिनी कोइफीशंट वैगेरे नुसार दिसणारी उत्पन्नातील तफावत नजीकच्या भविष्यात कमी होईलशी वाटत नाही. उच्चउत्पन्न गटाची जगण्याच्या वयाची सरासरी वाढेल असं मानलं तरी त्याचा एकूण सरासरीवर इतका प्रभाव पडेल असं वाटत नाही. त्यामुळं साधारण सध्या (आशावादी / सकारात्मक / सैल दृष्टिकोन ठेऊन) माणसाच्या जगण्याचा तुकडा सत्तर वर्षांचा असून नजीकच्या भविष्यात या सरसरीत जास्त बदल होणार नाही असं मानू. ४.६ अब्ज वर्षांपूर्वी आपल्या सुर्यमालेची निर्मिती झाली असं मी शेवटच्या वाचलेल्या विज्ञानाच्या एका शालेय पुस्तकात लिहिलं होतं. (त्यानंतर अभ्यासक्रमात काही बदल असेल तर माहिती नाही.) आणि अशाच एका पुस्तकात वाचल्यानुसार कुठल्याही ताऱ्याचं एक आयुष्य असतं आणि त्याच्या अवस्था असतात, ज्यात शेवटची अवस्था ही कृष्णविवर अवस्था (ताऱ्याच्या प्रकारानुसार) असू शकते. आज दुपारी chatgpt वर एका प्रश्नाला असं उत्तर आ...