Posts

Showing posts from November, 2023

मैत्रीचा हाफ लाईफ पिरियड

Image
मैत्रीचा हाफ लाईफ पिरियड   प्रत्येक गोष्टीची किंवा त्या गोष्टीच्या स्वरूपाची एक expiry date असते . तशी मैत्रीचीही expiry date असावी , असा विचार बऱ्याचदा येऊन गेला होता . बऱ्याचदा काही विशिष्ट मुद्द्यावरून सुरू झालेली मैत्री तो मुद्दा संपुष्टात आला तर हळूहळू कमजोर होत जाते . तसंच विशिष्ट परिस्थितीमुळ एका वातावरणात यावं लागल्यानं मैत्री सुरू होते .   ते विशिष्ट परिस्थितीजन्य वातावरण , त्या वातावरणात मित्रांच्या गटात झालेले उदव्याप आणि एकत्र असण्याच्या कालावधीच प्रमाण आणि त्या विशिष्ट परिस्थितीतून बाहेर आल्यानंतर परत भेटण्याची वारंवारीता यावरून मैत्रीची expiry date किती दूरची असेल याचा अंदाज बांधता येतो .   उदा . शाळा ही विशिष्ट परिस्थिती मानून त्यातील त्यातील एकत्र येणारे मित्र , त्यातील जास्तीत जास्त वर्षे एकच वर्गात असणारे , एकत्र असताना काहीतरी उद्व्याप केलेले , आणि शाळा संपल्यानंतरही भेटण्याची वारंवारीता जास्त असणाऱ्या मित्रांच्या मैत्रीची expiry date जवळपास मित्रांच्या expiry date पर्यंत मोठी असू शकते , कारण मैत्री अशी मैत्री घट्ट होत जात असतानाच ताजीही राहत जाते . ...