#यादृच्छिक
#यादृच्छिक #random This particular branch of the unidirectional forwarding branches of randomness is too rigid to move, having inherent resistance to move freely further. And yes, it's true that you're on your own while you are at such narrow and viscous passages. And it's also true, experience is a totally different thing than the bubbles of words. Amidst this chaos, I don't know why I yearn for the person I love the most in this entire universe, my late grandfather, तात्या. पांढरा लेंगा, सदरा आणि गांधी टोपी, सायकल, कंदील, दुधाच कॅन तथा क्यांड, आणि नेहमीच समाधानी आणि प्रसन्न चेहरा. कुठल्याही hesitation शिवाय त्यावेळी कुणाकडं व्यक्त होऊ शकेन असा एकमेव माणूस, आणि त्यामुळं खूप वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्याशी गप्पा व्हायच्या. त्यांना त्या वयातही नव्या गोष्टी ऐकायला आवडायचं. मी शाळेत नवीन काही भारी शिकलो की रात्री जेवल्यानंतर त्यांना सांगायचो आणि ते खूप मनापासून ते ऐकायचे, एवढा मोठा माणूस माझं काहीतरी मन लावून ऐकतो, हे मला खूपच भारी वाटायचं. तेपण नवीन काहीकाही सांगायचे. र...